Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे किराणा दुकान फोडून मुद्देमाल लांबविला

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील बाबा नगर येथील किराणा दुकान फोडून ४७ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल आणि रोकड चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रफिक शफि पटेल (वय-५५) रा. विरार नगर यावल यांचे यावल शहरातील बाबा नगर येथे किराणा दुकान आहे. २० जून रोजी रात्री ८.३० वाजता ते दुकान बंद करून घरी गेले होते. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकान फोडून ३१ हजार रुपयांची रोकड, १४ हजार रुपये किमतीचा किराणामाल आणि अडीच हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण ४७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. मंगळवार २१ जून रोजी सकाळी ६ वाजता ते दुकानावर आले असता त्यांना दुकान पडल्याचे निदर्शनास आले. याबाबत यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.  रफिक पटेल यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय सुनिता कोळपकर करीत आहे.

 

 

Exit mobile version