Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गेंदालाल मिलमध्ये बंद घर फोडून रोकड लांबविली; शहर पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गेंदालाल मिल परिसरातील बंद घर फोडून घरातील संसारोपयोगी वस्तू व रोकड असा एकुण २० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अकिलाबी शेख अनिश (वय-३८) रा. गेंदालाल मिल जळगाव ह्या पती व मुलांसह राहतात. मोलमजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. 13 मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास बहिणीकडे लग्न असल्यामुळे त्या पती व मुलासह अमरावती येथे गावाला गेले त्यावेळी त्यांनी घराला कुलूप लावले होते. १७ मार्च रेाजी त्या अमरावतीत असतांना शेजारच्यानी फोन करून  घरात चोरी झाल्याचे सांगितले. त्यांनी तातडीने त्याच दिवशी सायंकाळी जळगावला पोहोचले. घरी पोहोचल्यानंतर घराचा दरवाजाला लावलेले कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील गॅस सिलेंडर, हंडा, कळशी, पाण्याची मोटार आदीसह कपाटातील 19 हजार रुपये रोख  असा एकूण 20 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी अखीलाबी शेख अनिस यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेका उमेश भांडारकर करीत आहे.

Exit mobile version