Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एचडीएफसी बँकेची ऑनलाईन सेवा बंद ; ग्राहक वैतागले

HDFC bank

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशातील मोठ्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या एचडीएफसी बँकेची नेट बँकिंग सेवा सलग दुसऱ्या दिवशी मंदावली आहे. एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांनानेट बँकिंगचा त्रास होतो. नेटबँकिंग आणि मोबाईल बँकिंग अ‍ॅप बंद असल्यामुळे ग्राहकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे.

महिन्याच्या सुरुवातीलाच या सेवांमध्ये अडचणी येत असल्याने बिल पेमेंट किंवा अन्य व्यवहारांमध्ये खातेधारकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. सोमवारीही बँकेची नेटबँकिंग सेवा अनेक तास मंदावली होती. संध्याकाळी 6.15 वाजता एचडीएफसी बँकेने आपल्या ट्विटर हँडलवरुन सेवांमध्ये अडचणी असल्याची माहिती दिली होती. रात्री उशीरापर्यंत सेवा पूर्ववत झाल्या नव्हत्या. तांत्रिक कारणांमुळे खातेधारकांना नेटबँकिंग व मोबाइल बँकिंग अॅपमध्ये लॉगइन करता येत नाहीये असं बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर आज पुन्हा एकदा बँकेने खातेधारकांना होणाऱ्या त्रासाबाबत दिलगीरी व्यक्त केली असून तज्ज्ञांकडून समस्या सोडवण्याचे शर्थीचे प्रय़त्न सुरू असल्याची माहिती दिली आहे. लवकरच सर्व सेवा पूर्ववत होतील असं बँकेने आश्वस्त केलं आहे.

एचडीएफसीने ट्विट केलं, ‘तांत्रिक बिघाडामुळे आमचे काही ग्राहक नेटबँकिंग आणि मोबाइल बँकिंग अॅप लॉगइन करू शकत नाहीएत. आमचे तज्ज्ञ हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी काम करत आहेत आणि तुम्हाला लवकरच सेवा पूर्ववत करून देण्यात येईल.’

Exit mobile version