Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हतनूरचे ३६ दरवाजे अर्धा मीटरने उघडले (व्हिडीओ)

hatnur dharan

भुसावळ प्रतिनिधी । हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या टेक्सा, चिखलदरा व बऱ्हाणपूर येथे २६१ मिलीमिटर पावसाची नोंद झाली असून दि. 28 जुलै रविवार रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान हतनुर धरणाचे 14 दरवाजे अर्धा मीटरने उघडले आहे.

यंदाच्या पावसाळ्यात हतनूरमधून प्रथमच ३६ दरवाजे अर्धा मिटरने उघडून विसर्ग झाला. दि.28 जुलै रविवारी रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान ७८ मिली पाऊस असून धरणाचे १४ दरवाजे अर्धा मीटरने तर सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी ३६ दरवाजे अर्धा मीटरने उघडून प्रती सेकंद ९३६ क्युमेक्स अर्थात ३३ हजार ५९.२० क्युसेस वेगाने तापी पात्रात विसर्ग करण्यात आला. हतनूरच्या पाणलोटक्षेत्रात गेल्या २४ तासांमध्ये तब्बल २६१ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे सकाळी १० वाजता १४ दरवाजे अर्धा मिटरने उघडले आहे. रविवारी रोजी सकाळपासून देखील पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु होता. सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान 10 तासांमध्ये ७८ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात विसर्गानंतरही २०९.८३० मीटर जलपातळी असून धरणात पाण्याची आवक वाढेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान उजव्या तट कालव्यातूनही पूर्नभरणासाठी १२ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सलग 2 दिवसांपासून होत असलेल्या विसर्गामुळे तापी नदी दुथळी भरुन वाढत आहे. दरम्यान हतनूरच्या पाणलोटक्षेत्रात येणाऱ्या चिखलदरा, बऱ्हाणपूर, टेक्सा, ऐरडी, देडतलाई आदी ठिकाणी पून्हा पाऊस वाढल्यास धरणातील जलसाठा वाढून विसर्गही वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच धरणात सायंकाळी 7 वाजता १८९.९० दलघमी एकूण जलसाठा तर ५६.९० दलघमी जीवंत जलसाठा कायम होता.

Exit mobile version