हाथरस प्रकरणाची होणार सीबीआय चौकशी

लखनऊ वृत्तसंस्था । हाथरस येथील तरूणीची अत्याचार करून हत्या केल्या प्रकरणाची चौकशी आता सीबीआयकडे सोपविण्यात येणार असून युपी सरकारने राहूल गांधी यांच्या भेटीनंतर हा निर्णय घेतला.

राहूल गांधी व प्रियंका यांनी आज सायंकाळी पिडीत तरूणीच्या कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीच्या प्रसंगी मीडियाला परवानगी देण्यात आली नव्हती. तर रात्री साडेआठच्या सुमारास राहूल व प्रियंका गांधी या हाथरस येथून निघाल्या. यानंतर उत्तरप्रदेश सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे जाहीर करण्यात आले. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरवरून याबाबतची घोषणा केली.

हाथरस प्रकरणात जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांची भूमिका ही अतिशय संशयास्पद असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता होत आहे.

Protected Content