Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाल येथील हसन तडवी सेट परिक्षेत उत्तीर्ण

यावल प्रतिनिधी । येथील व मुळ पाल येथील रहिवासी हसन तडवी हे राज्य सहाय्यक प्राध्यापक (सेट) पात्रता परिक्षेत उत्तीर्ण झाले आहे. 

यावल येथील राहणारे व सद्या शासकीय नौकरीतील सेवेसाठी बांद्रा, मुंबई येथे राहणारे हसन तडवी यांनी लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, जळगाव  येथे शिक्षण घेतलेले हे महाराष्ट्र राज्य सहायक प्राध्यापक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. हसन तडवी हे कै. जहांगीर तडवी वन विभागातील निवृत्त वाहन चालक यांचे चिरंजीव आहेत.

हसन जहांगीर तडवी हे विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आयोजित  राज्य सहायक प्राध्यापक पात्रता परीक्षा सेट (SET) उत्तीर्ण झाल्याबद्दल यावल- रावेरचे आमदार शिरीष चौधरी तसेच मधुकराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव येथील प्राचार्य डॉ. वाय.जी. महाजन सर, प्रा.डॉ. उमेश वाणी सर, प्रा. डॉ. राकेश चौधरी, प्रा. डॉ नितिन बडगुजर, प्रा. डॉ. निलेश चौधरी. तसेच तडवी समाजातील अधिकारी, कर्मचारी, यावल येथील सामाजीक कार्यकर्त किरण तडवी व मित्र परिवार, समाज बांधव तसेच पाल गावातील सरपंच, गावकरी यांनी भविष्यातील पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देवुन तडवी यांचे अभिनंदन केले आहे.

Exit mobile version