Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आमदार हरिभाऊ जावळे यांनी स्वीकारला पदभार

WhatsApp Image

फैजपूर प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आमदार हरिभाऊ जावळे यांनी पुणे येथील कार्यालयात पदभार स्वीकारला.

यावेळी आमदार हरिभाऊ जावळे यांनी तात्काळ विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासोबत बैठक घेतली. संबधित अधिकारी यांच्याकडून त्यांनी सर्व विभागांची आणि त्यांच्या कामांची विस्तृत माहिती जणून घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी माती आणि शेतीशी जुळलेलो माणूस आहे. मला शेती आणि संशोधनामध्ये प्रचंड आवड आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून जे संशोधन होत आहे ते संशोधन, नवनवीन कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत आणि शेतीपर्यंत पोहाचण गरजेच आहे. परिषदेच्या माध्यमातून दूरगामी आणि तात्काळ असे ध्येय ठरवून त्या दृष्टीने आपण सर्व मिळून काम करण्याच्या सुचना दिल्यात. यावेळी सेवा प्रवेश मंडळ अध्यक्ष डॉं.विजय मेहता, शिक्षण संचालक डॉं.हरिहर कौसाडीकर, संचालक विस्तार शिक्षण डॉं.विठ्ठल शिर्के, सहसंचालक प्रशासन गणेश घोरपडे,वित्तीय सल्लागार गणेश पाटील आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version