हार्दीक पटेलचा जय श्रीराम ! भाजपमध्ये दाखल

अहमदाबाद – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसंस्था | पाटीदार समाजाचे मातब्बर नेते हार्दीक पटेल यांनी आज आपल्या हजारो समर्थकांसह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.

पाटीदार आंदोलनातून जगासमोर आलेले हार्दिक पटेल यांनी काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेसला रामराम ठोकला होता. तेव्हाच त्यांनी भाजपमध्ये जाणार असल्याचे सूचक संकेत दिले होते. या अनुषंगाने आज त्यांनी भाजपमध्ये १५ हजार समर्थकांसह प्रवेश केला. मी पंतप्रधान मोदींचा छोटा शिपाई, अशी भावना हार्दिक पटेल यांनी पक्षप्रवेशानंतर व्यक्त केली. मी आजपासून एक नवीन अध्याय सुरू करणार आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशासाठी काम करेन, असे ट्विट त्यांनी केले आहे.

दरम्यान, पक्ष प्रवेशाआधी पटेल यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत रॅली काढली. हार्दिक पटेल यांचा भाजप प्रवेश कॉंग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.   त्यांच्या पक्षप्रवेशामुळे गुजरातमध्ये भाजपची आणखी ताकद वाढणार असल्याचे मानले जात आहे. तर कॉंग्रेस सोडतांना त्यांनी या पक्षावर टीका देखील केली होती. कार्यकारी अध्यक्ष केलं, पण जबाबदारी कोणतीच दिली नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. शिवाय सातत्यानं मला डावलण्यात आलं, असा आरोपही त्यांनी केला होता.

Protected Content