Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विवाहितेचा पैशांसाठी छळ; पतीविरोधात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मोहाडी रोड परिसरातील माजी सैनिक सोसायटीत राहणाऱ्या विवाहितेला पैशांसाठी शारिरीक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरूवारी १८ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील मोहाडी रोडवरील माजी सैनिक सोसायटीत राहणाऱ्या ममता अजयसिंह ठाकूर वय ४० या महिला आपले पती अजयसिंह अंगतसिह ठाकूर यांचया सोबत वास्तव्याला आहे. पतीपत्नीचा संसार सुखाचा असतांना अजयसिंह ठाकूर याने विवाहितेला पैशांसाठी छळ करण्यास सुरूवात केली. त्यावेळी वांरवार शारिरीक व मानसिळ छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने अखेर महिलेने गुरूवारी १८ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती अजयसिंह अंगतसिंह ठाकूर याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील हे करीत आहे.

Exit mobile version