Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पैशांसाठी विवाहितेचा छळ; रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील हरीविठ्ठल नगर येथील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी बारीवाडा येथे पैशांसाठी मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या संदर्भात रामानंदनगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगर येथील माहेर असलेल्या पूजा ललित अडबाल वय-२७ यांचा विवाह जळगाव येथीलच बारीवाडा येथील ललित रवींद्र आडबाल यांच्याशी झालेला आहे. लग्नाच्या सुरुवातीचे ६ महिने चांगले गेले. त्यानंतर विवाहितेला माहेराहून पैसे आणावे, अशी मागणी केली. दरम्यान विहीतेने माहेराहून पैसे आणले नाही. याचा राग मनात धरून तिला चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला. सासू आणि नणंद यांनी देखील त्रास दिला. या त्रासाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. दरम्यान त्यांनी शुक्रवारी २२ मार्च रोजी रात्री ९ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून ललित रवींद्र आडबाल, सासू शकुंतला रवींद्र आडबार दोन्ही रा. बारीवाडा, जळगाव आणि नणंद नीलिमा पीरदीप बारी रा. नवसारी गुजरात अशा तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण जगदाळे हे करीत आहे.

Exit mobile version