Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पैशांसाठी विवाहितेचा छळ; दुसरे लग्न केल्याने पतीसह चौघांविरुध्द गुन्हा दाखल

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहिली पत्नी असतांना दुसरे लग्न केले; तसेच घर दुरुस्तीसाठी माहेरहून एक लाख रुपये आणावे म्हणुन होत असलेला छळाला कंटाळून पिडीत पत्नीने पतीसह तिघांविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, “मोनाली अंकुश कटारे रा. आदर्श नगर, पुनगाव रोड, पाचोरा यांचा विवाह येथील अंकुश भगवान कटारे यांचेशी झाला आहे. दरम्यान त्यांना एक ८ वर्षाचा मुलगा देखील आहे. दरम्यान अंकुश कटारे यांनी पहिली पत्नी असतांना दुसरे लग्न केले. घर दुरुस्तीसाठी हिचा माहेरहून एक लाख रुपये आणावे म्हणून मोनालीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला.

सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून तसेच पहिली पत्नी असतांना दुसरे लग्न केल्याने मोनाली अंकुश कटारे हिच्या फिर्यादीवरून पती अंकुश भगवान कटारे, मेघना प्रविण मानकरी, रामकृष्ण दामू सोनवणे व अनुराधा रामकृष्ण सोनवणे सर्व रा. पाचोरा यांचे विरुध्द पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील हे करीत आहे.

Exit mobile version