Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पैशांसाठी विवाहितेचा छळ; सात जणांवर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील माहेर असलेल्या विवाहितेचा पैशांसह विविध कारणांवरुन छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या सात जणांविरोधात सोमवार, १७ जुलै रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील जयश्री विनोद देसाई यांचा विवाहि नाशिक जिल्हृयातील मालेगाव मधील झोडगे या गावातील येथील विनोद बाळकृष्ण देसाई यांच्याशी झाला आहे. जयश्री हिला लग्नानंतर मुलगी झाली, मुलगा हवा होता, या कारणावरुन सासरच्यांनी वेळावेळी बोलून मानसिक छळ केला, तसेच जयश्री हिने माहेरुन हुंड्यापोटी घर बांधण्यासाठी दहा लाख रुपये आणावेत अशी मागणी जयश्री हिच्याकडे केली, जयश्री हिने पैसे आणण्यास नकार दिला असता, पतीसह सासरच्यांनी जयश्री हिचा मानसिक तसेच शारिरीक छळ केला, या छळाला कंटाळून जयश्री देसाई ह्या माहेरी निघून आल्या, सोमवारी त्यांनी याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली, या तक्रारीवरुन जयश्री यांचे पती विनोद देसाई, सासरे बाळकृष्ण देसाई, सासू किरण देसाई, तिघे रा, झोडगे ता. मालेगाव व मोठी नणंद पल्लवी दिपक मगर , नंदोई दिपक प्रताप मगर, दोन्ही रा. पुणे, तसेच लहान नणंद अश्विनी भूषण बागुल , नंदोई भूषण मधुकर बागुल दोन्ही रा. धुळे अशा सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किरण लक्ष्मण आगोणे हे करीत आहेत.

Exit mobile version