१० लाखांसाठी विवाहितेचा छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्लॉट घेण्यासाठी माहेरून १० लाख रूपये आणावे यासाठी पतीकडून विवाहितेला शिवगाळ करून मारहाण केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात रविवारी ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील मालखेडा येथील माहेर असलेल्या रेखा विश्वनाथ चव्हाण (वय 25) यांचा विवाह मध्यप्रदेशातील नायचोंडी येथील विश्वनाथ कालू चव्हाण यांच्याशी डिसेंबर २०२० मध्ये रीतीरीवाजानुसार झाला. लग्नाचे सुरुवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती विश्वनाथ काळू चव्हाण याला दारूचे व्यसन जडले. यामध्ये त्याने प्लॉट घेण्यासाठी माहेरहुन १० लाख रूपये आणावे अशी मागणी विवाहितेला केली. परंतु विवाहितेने पैसे आणले नाही, याचा राग धरून तिला मारहाण करून शिवीगाळ केली तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली. १० लाख रुपये आणले नाही म्हणून सासरच्या मंडळींनी देखील तगादा लावला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. रविवार ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता विवाहितेच्या फिर्यादीवरून पती विश्वनाथ कालू चव्हाण, सासरे कालू सदु चव्हाण, सासु गीता कालू चव्हाण, जेठ गोकुळ कालू चव्हाण, जेठांनी भारती गोकुळ चव्हाण, दिर मनोज कालू चव्हाण सर्व रा. नायचोंडी मध्य प्रदेश यांच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत विरणारे करीत आहे.

Protected Content