Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

झोपलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणारी अल्पवयीन मुलीचा झोपेत असतांना विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी, शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात राहणारी अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ४ जून रोजी सकाळी ५ वाजेच्या दरम्यान अल्पवयीन मुलगी ही झोपलेली असतांना गल्लीतील संशयित आरोपी तनविर शेख जलील शेख (वय-२३) याने अल्पवयीन मुलीशी अंगलट करून विनयभंग केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या आजीने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्ररीवरून संशयित आरोपी तनविर शेख जलील शेख याच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले करीत आहे.

Exit mobile version