Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कडगाव येथील विवाहितेचा छळ; नशिराबाद पोलीसात गुन्हा दाखल

mahila

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील कडगाव येथील  विवाहितेला नवीन दुचाकी घेण्यासाठी ५० हजार रूपये आणावे यासाठी शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू सासऱ्यांवर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कडगाव येथील माहेर असलेल्या खुशबू जितेंद्र धनगर (वय-२३) यांचा विवाह जितेंद्र विठ्ठल धनगर रा. बुधगाव ता. चोपडा यांच्याशी ३० एप्रिल रोजी रितीरिवाजानुसार झाला. लग्न झाल्यापासून पती जितेंद्र धनगर याने विवाहितेला माहेरहून नवीन दुचाकी घेण्यासाठी ५० हजार रूपये आणावे यासाठी तगादा लावला. परंतू पैश्यांची पुर्तता न केल्याने विवाहितेस मानसिक व शारिरीक छळ केला. तसेच विवाहितेच्या आईवडीलांना मारहाण करून जीवंत जाळण्याची धमकी दिली. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी कडगाव येथे निघून आल्या. याबाबत १४ फेब्रुवारी त्यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती जितेंद्र विठ्ठल धनगर, सासरे विठ्ठल निंबा धनगर, सासू उषाबाई विठ्ठल धनगर सर्व रा. बुधगाव ता. चोपडा यांच्या विरोधात सायंकाळी नशिराबाद पोलीसात ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अलियार खान करीत आहे.

 

Exit mobile version