Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सोन्याचे दागिने व पैसे न आणल्याने विवाहितेचा छळ

mahila

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विवाहितेने माहेरहून सोन्याचे दागिने व पैसे आणले नाही म्हणून शिवीगाळ व मारहाण केल्याची प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात पतीसह सासू व सासऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील न्हावी येथील माहेर असलेल्या सिमरन रहीम पिंजारी (वय-२६) यांचा विवाह मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथील रहीम मोहम्मद पिंजारी यांच्याशी रितीरिवाजानुसार सन २०२० मध्ये विवाह झाला. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती रहीम पिंजारी याने विवाहितेला माहेरहून सोन्याचे दागिने व पैश्यांची मागणी केली. पैसे आणले नाहीतर तुला नांदविणार नाही असे सांगून धमकी दिली. तसेच सासू आणि सासरे यांनी देखील पैश्यांसाठी तगादा लावला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. गुरूवार २१ एप्रिल रोजी विवाहितेने फैजपूरपोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती रहीम मोहम्मद पिंजारी, सासू तमीजा मोहम्मद पिंजारी आणि सासरे मोहम्मद पिंजारी सर्व रा. बऱ्हाणपूर मध्यप्रदेश यांच्या विरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक महेंद्र महाजन करीत आहे.

 

Exit mobile version