Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाच लाखांची मागणी करत विवाहितेचा छळ

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील वागटुकी येथील विवाहितेला माहेराहून ५ लाख रूपये आणण्याची मागणी करत शिवीगाळ व मारहाण केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, धरणगाव तालुक्यातील वागटुकी येथील माहेर असलेल्या सुदेष्णा कपिल पाटील (वय-२५) यांचा विवाह जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील कपिल मनोहर पाटील याच्याशी समाजाच्या रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नानंतर काही दिवसात विवाहितेला पती कपील याने पैशांची मागणी केली. माहेरहून ५ लाख रूपये आणावे अशी मागणी केली.

विवाहिने पैशांचा पुर्तता केली नाही याचा राग येवून तिला शिवीगाळ व मारहाण करून छळ केला. तसेच सासू, नणंद आणि नंदोई यांनी देखील टोमणे मारणे सुरू केले. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. याबाबत सोमवारी २५ सप्टेंबर रोजी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.

त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती कपिल मनोहर पाटील, सासू सुरेखा मनोहर पाटील दोन्ही रा. ममुराबाद ता.जि.जळगाव, नणंद जयश्री कैलास पाटील, नंदोई कैलास पाटील आणि नंणंद योगीता प्रशांत पाटील तिघे रा. लोणी ता.पारोळा यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजू पाटील करीत आहे.

Exit mobile version