Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विवाहितेला २० लाखांची मागणी करत छळ

बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील खडका चौफुली येथील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी चिंचवड येथे घर घेण्यासाठी २० लाख रुपयांची मागणी करत मारहाण करून छळ केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी शुक्रवार २९ डिसेंबर रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, भुसावळ शहरातील खडका चौफुली येथे माहेर असलेल्या मोहिनी गौरव शिरसाठ (वय-३०) यांचा विवाह पुण्यातील चिंचवड येथील गौरव वसंतराव शिरसाठ यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाच्या सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले. त्यानंतर तिचे पती गौरव शिरसाठ याने पुण्यात घर घेण्यासाठी विवाहितेला माहेराहून २० लाख रुपये आणण्याची मागणी केली. दरम्यान विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तिला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच सासरच्या मंडळींनी देखील शारीरिक छळ केला. दरम्यान हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरीत निघून आल्या. त्यानंतर त्यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार पती गौरव वसंतराव शिरसाठ, सासरे वसंतराव गुलाबराव शिरसाठ, सासू रंजना वसंतराव शिरसाट, दीर रविराज वसंतराव शिरसाठ, ननंद प्रियंका दिनेश मोरे सर्व रा. चिंचवड पुणे यांच्या विरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनवर शेख हे करीत आहे.

Exit mobile version