Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुचाकी घेण्यासाठी विवाहितेला १ लाखांची मागणी करत छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील प्रेम नगरातील माहेर असलेल्या विवाहितेला माहेराहून दुचाकी घेण्यासाठी १ लाख रूपयांची मागणी करत  शारिरीक व मानसिक छळ केल्याबाबतची तक्रार गुरूवारी २३ नोव्हेंबर रोजी १२ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील प्रेम नगरातील माहेर असलेल्या तरनुम नईम तंबोली (वय-३१) यांचा विवाह सुप्रिम कॉलनी राहणारे नईम याकुब तांबोली यांच्यासोबत रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे सुरूवातील काही दिवस चांगले गेले त्यानंतर विवाहितेला माहेराहून दुचाकी घेण्यासाठी १ लाखांची मागणी केली. दरम्यान विवाहितेच्या आईवडीलांची परिस्थीत नाजूक असल्याने विवाहितेने पैसे आणले नाही. याचा राग आल्याने पती नईम याकुब याने विवाहितेला शारिरीक व मानसिक छळ केला. शिवाय सासू, सासरे यांनी देखील तगादा लावला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यानंतर गुरूवारी २३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पती नईम याकुब तांबोली, सासू मरीयमबी याकुब तांबोली, सासरे याकुब कासम तांबोली सर्व रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सचिन पाटील करीत आहे.

Exit mobile version