Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पैशांसाठी विवाहितेला मारहाण करत छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील प्रेम नगरातील माहेर असलेल्या विवाहितेला डोंबिवली येथील सासरी पैशांची मागणी करत शिवीगाळ आणि मारहाण केल्याची तक्रार गुरूवार ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता पोलीसात देण्यात आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील प्रेम नगरात माहेर असलेल्या खुशी आकाश लोडाया वय-२६ यांचा विवाह डोंबिवली येथील आकाश पंकज लोडाया यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर किरकोळ कारणावरून टोमणे मारणे सुरू झाले. त्यानंतर पती आकाश याने विवाहितेला व्यावसायासाठी आणि कॅनडा येथे जाण्यासाठी माहेराहून पैसे आणण्याची मागणी केली. दरम्यान, विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तिला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिचे सासू, सासरे आणि ननंद यांनी देखील त्रास दिला. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता जळगाव येथील माहेरी निघून आल्या. त्यानंतर गुरूवारी ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता जिल्हापेठ पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती आकाश पंकज लोडाया, सासू किरण पंकज लोडाया, सासरे पंकज पदमशी लोडाय आणि ननंद लेखा भावेश खोना सर्व रा. डोंबिवली यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उल्हास चऱ्हाटे करीत आहे.

Exit mobile version