Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करून छळ !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील गणेशपुरी परिसरात राहणाऱ्या विवाहितेला कारण नसताना शिवीगाळ व मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या संदर्भात बुधवारी २९ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील गणेशपुरी भागात बाहेर असलेल्या दीपिका प्रशांत सोनवणे (वय-३२) यांचा विवाह पुणे येथील प्रशांत रामचंद्र सोनवणे यांच्याशी रितीरिवादजानुसार झालेला आहे. दरम्यान काहीही कारण नसताना पती प्रशांत सोनवणे यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर मानसिक व शारीरिक त्रास देऊन छळ केला. शिवाय सासरे दीर, नणंद, नंदोईभाऊ यांनी देखील छळ केला. हा प्रकार सहन न  झाल्याने विवाहिता भुसावळ येथे माहेरी निघून आल्या.  बुधवारी २९ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता विवाहितेने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार भुसावळ पोलीस ठाण्यात पती प्रशांत रामचंद्र सोनवणे, सासरे रामचंद्र सोनवणे, दीर तुषार रामचंद्र सोनवणे, ननंद मीनाक्षी निखिल संसारे, नांदोई, भाऊ निखिल नंदकुमार संसारे सर्व रा. पुणे आणि संतोष बाविस्कर रा. शिरपूर या ६ जणांविरोधात बुधवारी २९ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मिलिंद कंक करीत आहे.

Exit mobile version