Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपूरात यंदा जल्लोषात साजरा होणार हनुमान जन्मोत्सव

फैजपुर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । यंदा शहरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येणार असल्याचे फैजपूर येथील हनुमान जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष वैभव आनंदा वाकरे यांनी सांगितले.

फैजपूर शहरातील मोठ्या थाटामाटात होणारा उत्सव म्हणजे हनुमान जन्मोत्सव कोरोनाचा प्रदुर्भावने दोन वर्षांपासून कार्यक्रम साजरे झाले नाही. यंदा हनुमान जन्मोत्सव दि. १६ एप्रिल रोजी असुन सकाळी अभिषेक आरती,सायंकाळी भंडारा (महाप्रसाद)व दि. १७ रोजी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या वर्षी मोठ्या जलोषात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे, असे हनुमान जन्मोत्सव समिती फैजपूर अध्यक्ष वैभव आनंदा वकारे यांनी सांगितले आहे.

दरम्यान यंदा हनुमान जन्मोत्सव समिती गठीत झाली आहे.अध्यक्ष वैभव आनंदा वकारे, उपाध्यक्षा तुषार किरंगे, सचिव देवेंद्र दिलीप चौधरी, खजिनदार अक्षय परदेशी, सदस्य बंटी कोळी, सचिन साळी, रॉबिन अरोरा, निलेश वर्मी, गणेश परदेशी, विनोद कपले, राकेश मिस्तरी, प्रयास वर्मा, जितेंद्र नेमाडे, आतिश परदेशी, यश वर्मा, योगेश सूर्यवंशी, ऋषी वकारे, ललित परदेशी, मनोज परदेशी, गौरव टोके, चंदन कोळी, रुपेश मिस्तरी, झील वर्मा, सागर कपले, लोकेश वाघ, राजेश सनंसे आदी यावेळी उपस्थिती होते.

 

 

Exit mobile version