Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पुण्यात १३ ऑक्टोबर रोजी हाफ मॅरेथॉन स्पर्धा

pune

पुणे प्रतिनिधी । पुणे रोड रनर्स, ॲव्हरोम स्पोर्ट्स आणि एचडीएफसी बँक युनाइट यांच्यातर्फे पुणे हाफ मॅरेथॉनचे १३ ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. विवेक बिल्लमपल्ली यांनी दिली. २१ किलोमीटर धावण्याच्या शर्यतीसह १० आणि ६ किलोमीटर अंतराच्या धावण्याच्या शर्यतीही होणार आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे ग्रामिण पोलिस ग्राउंड (पाषाण) येथून हाफ मॅरेथॉनला प्रारंभ होईल आणि याच ठिकाणी या शर्यतीचा समारोप होणार आहे. स्पर्धेत एकूण १ लाख ३५ हजार रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहे. या हाफ मॅरेथॉनद्वारे ‘पाणी वाचवा’ असा संदेश दिला जाणार आहे.

Exit mobile version