Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हाफ जिन्सला प्रियंकांचे उत्तर ! : म्हणाल्या….

नवी दिल्ली । उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांनी हाफ जीन्सबाबत केलेल्या वक्तव्याला आज काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी खोचक उत्तर दिले आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री रावत यांनी एका कार्यक्रमात बोलताना महिला वापरत असलेल्या जीन्सवर विधान केलं. “आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत,” असं रावत यांनी म्हटलं आहे. बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी जीन्ससंदर्भात हे वक्तव्य केलं आहे. मुलांवर होणाऱ्या संस्कारला पालक जबाबदार असतात, असंही ते म्हणाले.

त्यानंतर, देशभरातून महिलांनी संताप व्यक्त केला असून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधीनीही रावत यांच्यावर टीका केली आहे. प्रियंका गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो “अरे देवा, त्यांचे गुडघे दिसत आहेत,” अशा कॅप्शनसहीत एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सरसंघचालक मोहन भागवत आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुन्या फोटोंचं कोलाज आहे. या फोटोंमध्ये हे सर्व वरिष्ठ नेते संघाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले दिसत असून त्यांनी संघाचा पोशाख म्हणजेच अर्ध्या बाह्यांचा पांढरा शर्ट आणि हाफ पॅण्ट घातलेली दिसत आहे. रावत यांनी गुडघे दिसणाऱ्या महिलांसंदर्भात वक्तव्य केल्याने त्याचा आधार घेत प्रियंका यांनी या वरिष्ठ नेत्यांचेही गुडघे दिसत होते असा टोला लगावला आहे.

Exit mobile version