Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खडकदेवळा परिसरातील रब्बी पिकांना गारपीटचा फटका (व्हिडीओ)

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील खडकदेवळा येथे वादळीवारा आणि गारपीटसह झालेल्या अवकाळी पावसामुळे परिसरातील शेतकरांचे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तब्बल तीन दिवसापासून वादळी पावसासह गारपिटीने झोडपल्याने रब्बी, फळबाग,मका  व फुल गोबी भाजीपाला पिके भुईसपाट झाली. अवघ्या २० ते २५ मिनिटात होत्याचे नव्हते झाले. तब्बल तीन दिवसापासून  तुफान गारपीट व वादळी पाऊस झाल्याने लाखो रुपयांची हानी झाली आहे. पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील शेतकरी संतोष श्रावण दाभाडे यांचे शेतातील मका आणि फुल गोबी पिकांचे झालेल्या वादळी वारे सह गारपीटचा मोठा फटका बसला आहे. वादळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या पीक नुकसानाचे महसूल व कृषी विभागाकडून पंचनामे करण्याची मागणी संतोष दाभाडे यांचेसह परिसरातील शेतकऱ्यांनी  केली आहे.

https://www.facebook.com/508992935887325/videos/235822941566628

Exit mobile version