दिपनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दिपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या वसाहतीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांनी हैदोस मांडलेला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. दिपनगर औष्णिक विद्यूक केंद्र प्रशासनाकडून याबाबत कोणतीही दखल घेतली जात नाही.
फुलगाव येथील तरूणाचा पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात मॄत्यूची घटनी ताजी असतांना दिपनगर येथील पटांगणावर पोलीस भरतीकरिता सराव करणारी कु.रोशनी वानखेडे (वय १८ वर्ष ) हिच्यावर अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला आणि तिच्या हाताला जबर चावा घेत गंभीर दुखापत केली. तसेच या पिसाळलेल्या कुत्र्यांच्या वावर फेकरी आणि निंभोरा गावच्या परिसरासुद्धा वाढत असून काल संध्याकाळी फेकरी येथील राजेंद्र काशिनाथ लोहार (वय ३० वर्ष) हा तरुण दीपनगर वसाहतीकडून फेकरी गावाकडे पायी जात असतांना पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ला चढवीत त्याच्या पोटाला चावा घेऊन त्याला जखमी केले. दीपनगर प्रशासनाने मोकाट कुत्र्यांना विद्युत केंद्र वसाहतीमधून बाहेर काढणेकामी लवकरात लवकर उपाययोजना करण्यासाठीची मागणी वसाहतीमधील सुज्ञ नागरीकांकडून होत आहे.