Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

“हात से हात जोडो” अभियानाची पाचोरा येथे सुरवात

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कॉंग्रेस च्या भारत जोडो यात्रे नंतर आता ” हात से हात जोडो ” यात्रेला पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथुन शुभारंभ झाला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार यांनी आदेशित केलेल्या परिपत्रकानुसार पाचोरा तालुका समन्वयक पदी “हातसे हात जोडो अभियानासाठी समन्वयक सौ. अर्चनाताई रविंद्र पोळ यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचोरा काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नियोजनात त्यांच्या संपर्क कार्यालयाजवळ विभागात कार्यकर्त्यांची मेळावा घेत परिपत्रकानुसार त्यांना मार्गदर्शन केले.
शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण यांच्या कार्यक्षेत्रात शुभारंभ करीत तालुक्यातील खडकदेवळा येथे कॉंग्रेस ग्रामपंचायत सदस्य श्रावण गायकवाड यांच्या वार्डात झेंडावंदन केले. संपूर्ण गावात रैली काढून गावातील ग्रामस्थांना ” हात से हात जोडे” या अभियानाचे महत्व व कांग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत (३५०० कि.मी.) पायी सुरू असलेल्या पदयात्रेतील महत्वाचे विषय नमुद केले. यावेळी ” नफरत छोड़ो भारत जोडो ” च्या घोषणांनी परिसर दणाणला.

भारत आर्थीक संकटात आहे, गोर गरीब जनता महागाई बेरोजगारी ने त्रस्त आहे. मात्र राज्यकर्त्यांना त्याचा विसर पडला असून या कडे दुर्लक्ष करत जातीय तेढ निर्माण करून माणसाला माणसापासून दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे हे थांबविण्यासाठी समता, बंधुता व न्याय यासाठी “हात से हात जोडो” अभियान राबविब्यात येत असून घरी घरी जाऊन लोकांना या माध्यमातून जोडण्याचे कार्य केले जाणार असल्याचे समन्वयक अर्चना ताई पोळ यांनी सांगितले.

यावेळी पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी देखील आपल्या भाषणात सांगितले की, पाचोरा तालुक्यातील प्रत्येक गावातील घरा पर्यंत हाथ से हाथ जोडो अभियानात आरोग्य शिबीर देखील आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी शेख इस्माईल शेख फकीरा, शहराध्यक्ष अमजद पठाण, रवींद्र पोळ, ओबीसी तालुका अध्यक्ष इरफान मनियार, नितीन पवार, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, एस सी सेल तालुका अध्यक्ष श्रावण गायकवाड,रवींद्र सुरवाडे, अजबराव काटे, भगवान वाघ, बापु पाटील, बापु पाटील, भैय्या गायकवाड शंकर गायकवाड, सागर गायकवाड, रवींद्र पाटील, धाकलु शिंपी, इरफान शेख इसा, अलिशा हारुन शाह, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, गणेश परदेशी, शैलेश गायकवाड, मयुर कोळी, सागर तेली, शुभम गायकवाड, गणेश साठे, वाल्मिक तेली, भोला शिंपी, राजेंद्र धोबी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह उपस्थितीत होते.

Exit mobile version