Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सावद्यात साडेतीन लाखाचा गुटखा पकडला; एकावर गुन्हा दाखल

सावदा ता. रावेर (प्रतिनिधी) । शहरातील बसस्थानकाच्या मागील भागात असलेल्या एका दुकानावर अन्न व औषध विभागाने छापा टाकून सुमारे ३ लाख ६७ हजार रूपयांची गुटखा व सुगंधी पान मसालाचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, सावदा शहरात मोठ्या प्रमाणात अवैध अवैध गुटखा विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे शहरातील बसस्थानकाच्या मागे असेल्या लखन ट्रेडर्सवर १० नोव्हेंबर रोजी दुपारी अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली. या कारवाईत ३ लाख ६७ हजार रूपये किंमतीचे गुटखा आणि सुगंधीत पान मसाला जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सुरेश कुमार दिपचंद अमर नानी यांच्यावर सावदा पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Exit mobile version