Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

छुप्या मार्गाने गुटख्याची वाहतूक करत उघडपणे सर्वत्र विक्री !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपुर परिसरात गुटका माफीयावर कारवाई होत असतांना मात्र यावल पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सर्वत्र न्यायालयाने प्रतिबंधीत केलेल्या व शेजारच्या राज्यातुन तस्करीतुन आयात करून विक्रीस येणाऱ्या मौखिक आरोग्याच्या समस्या विविध गंभीर स्वरूपाचे आजार निर्माण करणारा विमल पानमसाला गुटख्याची सर्रासपणे यावल शहरात विक्री केली जात आहे. याकडे अन्न व औषद्य प्रशासन विभागाचे अर्थपुर्ण दुर्लक्ष होत असल्याचे ओरड नागरीकांकडून केली जात आहे.

यावल ,चोपडा आणी रावेर हे तिघ तालुके सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी  असुन सिमा रेषेवर गुजरात आणी मध्यप्रदेश अशी दोन राज्य तालुक्यास लागून असल्याने या दोघ राज्यातुन मोठया प्रमाणावर न्यायालयाने प्रतिबंधीत केलेल्या विमल गुटका या पानमसालाची खाजगी वाहन व प्रसंगी एसटीव्दारे चोरट्या मार्गाने महाराष्ट्र वाहतुक करून यावल तालुक्यातील काही गुटखा माफियांकडून करण्यात येत असून नंतर एका गोदामात या गुटख्याची साठवण करून तालुक्यात विविध ठिकाणी विक्रीसाठी या गुटक्याची टप्प्या टप्याने वाटप करण्यात येत आहे. शेजारच्या परप्रांतातुन छुप्या मार्गाने आयात करून येणाऱ्या या हानीकारक पानमसाला गुटक्याची एका महिन्यास सुमारे ५० ते ६० लाखाची विक्री करण्यात येत आहे.

या बाबतची माहीती संबधीत अन्न व प्रशासन  विभागाला नसावी का असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत असुन जिल्ह्यात अनेक ठीकाणी लाखो रुपयांचा गुटका पकडला जात असुन मात्र यावल तालुक्यात प्रशासनाकडुन या विषयाकडे अर्थपुर्ण डोळेझाक करण्यात येत असल्याने कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे

Exit mobile version