Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगावात गुटखा व पानमसाल्याची साठवणूक; एकावर कारवाई

चाळीसगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील परिवार कलेक्शन समोरील पाटीलवाडा येथे बेकायदेशीर सुगंधित पान मसाला व गुटखा याची साठवणूक केल्याप्रकरणी एकावर पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणात ५७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील परिवार कलेक्शन समोर असलेल्या पाटीलवाडा या ठिकाणी अवैधरित्या बेकायदेशीरपणे प्रतिबंधित असलेला पान मसाला व गुटखा विकीसाठी साठवणूक केल्याची माहिती चाळीसगाव शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी गुरुवारी १२ जुलै रोजी रात्री ८ वाजता धडक कारवाई करत असताना ५७ हजार ६३८ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी विजय चंद्रकांत देवरे रा. पाटीलवाडा, चाळीसगाव याच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सागर ढिकले करीत आहे.

Exit mobile version