Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुरुपौर्णिमेनिमित्त निघालेल्या पायी दिंडीचे शेगावात आगमन

शेगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | मलकापूर येथील श्री संत गजानन महाराज उत्सव सेवा ट्रस्टच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त मलकापूर ते शेगाव पायी पदयात्रा काढण्यात आली. सोमवारी सकाळी सात वाजता दिंडी शेगावकडे निघाली. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी संताच्या पालखीचे नागरी शेगावात आगमन झाले.

दिंडी यात्रेत शेकडो टाळकरी भाविकांचा सहभाग आहे. सकाळी प्रस्थान झाल्यानंतर प्रथम मुंधडा पेट्रोल पंप येथे महेश अर्बन क्रेडिट सोसायटी व मक्खनलाल मुंधडा परिवाराकडून अल्पोपाहार देण्यात आला. विटाळी धानोरा येथे केदार एकडे यांनी सरबत दिले. दुपारी वडनेर येथे मोहता परिवाराकडून महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली.

त्यांनतर नांदुऱ्याकडे प्रस्थान झाले. तेथे कमल टावरी यांनी नाश्ता दिला. नांदुरा येथे रात्री ८ वाजता कोठारी हायस्कूल येथे मुक्काम करण्यात आला. यावेळी विठ्ठलदास कोठारी यांनी महाप्रसाद वाटप केले. आमदार राजेश एकडे यांनी पालखीचे दर्शन घेतले. बुधवारी सकाळी नांदुऱ्यावरुन पालखीने शेगाव कडे आगेकूच केली. तर गुरुपौर्णिमेच्या औचित्याने सकाळी ११ वाजेच्या दरम्यान पालखी शेगाव येथे पोहोचली आहे.

नांदुरा येथे शनिवार ८ कोठारी हायस्कूल येथे मुक्काम करण्यात आला. विठ्ठलदास कोठारी यांनी महाप्रसाद वाटप केले. कर्मचारी राजेश एकडे यांनी पालखीचे दर्शन घेतले. फक्त त्यांच्या नांदुल्या पालखीने शेगावकडे पुढेकूच केली. तर गुरुपौर्णिम औचित्याने ११ वाजेच्या दरम्यान पालखी शेगाव येथे सापडली आहे.

 

 

Exit mobile version