Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पारोळा येथे गुरू नानक व बाबा जुडयाराम यांची जयंती उत्साहात (व्हिडीओ)

gurunank jayanti

पारोळा प्रतिनिधी । शहरात सालाबादप्रमाणे यंदाही सिंधी समाजाच्यावतीने आज गुरू नानक यांची ५५०वी व बाबा जुड्याराम यांची ११३वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सर्व प्रथम सकाळी ५ वाजता, गुरू नानक देव व बाबा जुड्याराम यांच्या प्रतिमांना पंचामृत स्नान करण्यात आलं. तसेच १५ दिवसांपासून शहरातील विविध भागातून प्रभात फेरीचे आयोजन होत असून त्या प्रभात फेरीचे रूपांतर आज भव्य मिरवणुकीत झाले. ओत्तार गल्ली येथुन सकाळी १० वाजता वाद्यसह भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गुरू नानकदेव व बाबा जुड्याराम यांची प्रतिमा गाडीत ठेवण्यात आली होती. मिरवणूकी दरम्यान मार्गावर प्रसाद वाटप करण्यात आला होता. समाजातील प्रसिद्ध शेझ दांडिया नृत्य हे मिरवणूकीचे आकर्षण बनले होते. मंदिरात गेल्या पंधरा दिवसापासून कार्तिक मासचे माहात्म म्हणून कथेचे आयोजन केले होते. त्याचे आज विधिवत समापन करण्यात आले. सायंकाळी ८ वाजेपासून मंदिरात गुरू नानक देव व बाबा जुड्याराम यांच्या जन्मोत्सवचा कार्यक्रम सुरू होणार आहे. दोघ संताचे जन्मोत्सवात मोठ-मोठे केक कापून व एकमेकांना शुभेच्छा देण्यात येणार आहे. रात्री सर्व समाजासाठी आम भंडा-याचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्व कार्यक्रम बाबा जुड्याराम यांचे नातू साई हिरानंद व यांच्या सुविद्य पत्नी निलम देवी यांच्या सान्निध्यात यशस्वी पणे पार पाडण्यासाठी समाजातील वरिष्ठ किशनचंद हिंदुजा, नारायणदास लालवानी, लालचंद नंदवानी, बालचंद नंदवानी, प्रेमचंद मेलवाणी, मनोहर हिंदुजा, राजकुमार नागदेव, विजय हिंदुजा, खेमचंद हिंदुजा, याच्या मार्गदर्शनाखाली समाज अध्यक्ष अशोक कुमार लालवानी, उपाध्यक्ष शंकर हिंदुजा, समिती सदस्य महेश हिंदुजा, चंदूलाल नंदवानी, कैलास वालेचा, नंदलाल मेलवाणी, धर्मेंद्र हिंदुजा, घनश्याम हिंदुजा, बन्सी हिंदुजा, विष्णू वालेचा, गिरधर लुल्ला, तसेच जय झुलेलाल नवयुवक मंडळाचे सदस्य कमल लालवानी, किशोर नंदवानी, जितेंद्र हिंदुजा, आशिष हिंदुजा, जितेंद्र नंदवानी, विक्रम लालवानी, गोलु नागदेव, सुनिल वालेचा, अजय लालवानी, चंदूलाल नागदेव, हिरानंद हिंदुजा, हिरालाल मेलवाणी, रामचंद हिंदुजा, विष्णू वालेचा, गोपाल हिंदुजा, बन्सी हिंदुजा, राम हिंदुजा, सुनिल हिंदुजा, भुषण लालवानी, यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे शेवटी संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपार पाडल्या बद्दल समाज अध्यक्ष अशोक कुमार लालवानी यांनी सर्व समाज बांधवाचे आभार मानले.

Exit mobile version