Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पुण्यात गँगवॉरमधून गोळीबार ; रस्त्यावरील निष्पाप माणसाचा बळी

firing

 

पुणे (वृत्तसंस्था) पुण्यातील हडपसरमध्ये गँगवॉरमधून झालेल्या गोळीबारात रस्त्यावरील निष्पाप माणसाचा बळी गेल्याची घटना घडली आहे. हडपसर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून हल्लेखोरांचा शोध सुरु आहे.

 

गोळीबारात रस्त्यावरुन जाणाऱ्या पंचय्या सिद्धय्या स्वामी या 55 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. फुरसुंगीमध्ये मंगळवारी (13 ऑगस्ट) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास तरुणांच्या दोन टोळींमध्ये भांडण सुरु होते. यादरम्यान, एकाने दुसऱ्या टोळीच्या दिशेने बंदुकीतून गोळी झाडली. ही गोळी रस्त्यावरुन जाणाऱ्या स्वामी यांना लागली. त्यांना तातडीने नोबेल रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पंचय्या सिद्धय्या स्वामी हे एका बँकेत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते.

Exit mobile version