Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुलाबभाऊंचे मंत्रीपद निश्‍चित; समर्थकांची जल्लोषाची तयारी

धरणगाव प्रतिनिधी । उध्दव ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबभाऊ पाटील यांचे मंत्रीपद निश्‍चित झाले असून त्यांच्या समर्थकांनी याचा जल्लोष करण्याची जय्यत तयारी केल्याचे दिसून येत आहे.

जळगाव ग्रामीण मतदारसंघात नुकतेच दणदणीत मताधिक्याने निवडून आलेले आमदार गुलाबराव पाटील यांना मंत्रीपद मिळणार असल्याचे संकेत आधीपासूनच मिळाले होते. आता ठाकरे सरकारचा सोमवारी दुपारी शपथविधी होत असून यात ते मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. गुलाबभाऊंना नेमके कोणते खाते मिळणार याबद्दल अद्याप माहिती मिळाली नसली तरी त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याचे निश्‍चित मानले जात आहे. यामुळे जळगाव ग्रामीण अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते रविवारी रात्री मुंबई येथे रवाना होणार असल्याचे वृत्त आहे. शपथविधीच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, शपथविधी झाल्यानंतर मंगळवारी सकाळी गुलाबभाऊ पाटील यांचे आगमन होणार असून याप्रसंगी त्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्याची तयारी देखील त्यांच्या समर्थकांनी केली आहे. या माध्यमातून लागोपाठ दुसर्‍यांदा त्यांच्याकडे मंत्रीपदाची धुरा येणार आहे.

Exit mobile version