Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वीज समस्येने हैराण नागरिकांचा ना. गुलाबराव पाटील यांना घेराव ( व्हिडीओ )

gulabrao patil gherao

जळगाव प्रतिनिधी । शहरातील वाल्मिकनगर, कांचननगर व परिसरातील नागरिकांनी डीपीच्या दुरूस्तीसाठी ना. गुलाबराव पाटील यांना घेराव घालून आपल्या समस्यांचा पाढा वाचला.

याबाबत वृत्त असे की, वीज वितरणच्या भोंगळ कारभारामुळे वाल्मीकनगर व परिसरातील नागरिक हैराण झालेले आहेत. या भागातील डीपी दुरूस्त करण्यात येत नसल्याने नागरिकांना अडचणी येत आहेत. या अनुषंगाने नागरिकांनी नुकतेच डीपीचे पूजन करून आपला रोष व्यक्त केला होता. यानंतर आज आसोदा येथे कार्यक्रमासाठी जाणारे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना घेराव घालून त्यांना समस्यांबाबत सांगण्यात आले. त्यांनी तातडीने अधिकार्‍यांना फोन करून ट्रान्सफार्मर दुरूस्त करण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे हेदेखील उपस्थित होते.

पहा : ना. गुलाबराव पाटील यांना घातलेल्या घेरावचा लाईव्ह व्हिडीओ.

Exit mobile version