कृषिदूतांकडून सावदा परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन

सावदा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न गोदावरी फाउंडेशनचे डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील ‘ कृषिदूत ‘ रावेर तालुक्यातील सावदा येथे येथे दाखल झाले आहेत.

ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत विविध नवीन तंत्रज्ञानाची माहिती, माती व पाणी परीक्षण तसेच कीड व रोग यांचे एकात्मिक व्यवस्थापन, जनावरांचे संगोपन, शेतीविषयक विविध समस्या व त्यावरील उपाययोजना आदी विषयांचे सखोल विश्लेषण या कृषिदूतांकडून करण्यात येत आहे.

महाविद्यालयाचे विद्यार्थी गणेश चव्हाण, किरण गरड, कृष्णा देवरे, आशिष देशमुख, कौशल चौधरी, बग्गानगरी वामशीकुमार रेड्डी हे ‘कृषिदूत’ सावदा येथे काही दिवस मुक्कामी आहेत. पुढील दहा आठवडे पदवीत आत्मसात केलेल्या कृषीविषयक ज्ञानाचा उपयोग करून परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

यावेळी त्यांना सावदा नगरपरिषद, प्रगतिशील शेतकरी तसेच तलाठी शरद किसन पाटील यांच्या उपस्थितीत गावातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.त्यांना कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शैलेश तायडे, कार्यक्रम समन्वयक  एम.ए. देशमुख तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा.विजय गवांदे यांचे मार्गदर्शन लाभले.

Protected Content