Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशनवर मार्गदर्शन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात गुरुवार दिनांक १२ ऑक्टोबर रोजी ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन स्किल्सवर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी स्त्रीरोग तज्ञांनी स्तनाच्या कॅन्सरवर मार्गदर्शन करुन स्तन कॅन्सर ओळखण्यासाठी स्वत: तपासणी कशी करावयाची याबाबत प्रात्याक्षिकाद्वारे टिप्स दिल्यात.

महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. मात्र स्तनाचा कर्करोग ओळखण्यापूर्वी शरिरात विविध बदल होत असतात, ते जर वेळीच ओळखता आले तर स्तन कर्करोगावर मात करणे शक्य आहे. त्याअनुषंगाने आज गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात स्तनाचा कर्करोगाच्या लक्षणांची स्वत: तपासणी कशी करावयाचे यासंदर्भात जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी स्त्रीरोग तज्ञ डॉ.माया आर्विकर, निवासी डॉ.नेहा पटेल यांना आमंत्रित केले होते. मान्यवरांचे स्वागत करुन कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.विशाखा वाघ यांनी केले.

याप्रसंगी स्त्रीरोग तज्ञ डॉ.माया आर्विकर यांनी स्तनाचा कर्करोग व त्याविषयी सविस्तर माहिती उदाहरणाद्वारे दिली. वेळीच कर्करोगाची लक्षणे ओळखून डॉक्टरांद्वारे उपचार घेणे गरजेचे असल्याचे आवाहन डॉ.आर्विकर यांनी केले. यानंतर डॉ.नेहा पटेल यांनी स्तन कॅन्सर ओळखण्यासाठी आवश्यक तपासण्यांची माहिती देवून प्रात्याक्षिकही करुन दाखविले.

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.विशाखा वाघ, प्रा.शिवानंद बिरादर, प्रशासकीय अधिकारी प्रविण कोल्हे, कम्युनिटी नर्सिंग हेल्थ विभागप्रमुख डॉ.जैसिंथ दाया यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यासाठी प्रा.निर्भय मोहोड, प्रा.रेबेका लोंढे, प्रा.प्रिया जाधव, प्रा.स्वाती गाडेगोने, प्रा.रुचिता समरीत, प्रा.रितेश पडघन, प्रा.स्वरुपा कामडी, प्रा.प्राजक्‍ता आरख, प्रा.भुमिका जंजाळ यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डिव्हायना पवार व आभार प्रदर्शन आश्‍लेषा मून यांनी केले.

Exit mobile version