मोहराळे येथे महिलांसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबीर

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील मोहराळे येथे ग्रामपंचायत व आस बहुउद्देशीय विकास संस्था भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोहराळे ग्रामपंचायत १५ वित्त आयोगांतर्गत गावातील महिला व मुलींसाठी प्रशिक्षण व ब्युटीपार्लर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

मोहराळे हरिपुरा ग्रुप ग्रामपंचायत सरपंच नंदा गोपाळ महाजन यांनी ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित केला होता ग्रामपंचायत मोहराळे आस बहुउद्देशीय संस्था, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमानाने गावातील प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा शुभारंभासाठी व विद्यार्थिनी महिला यांनी ब्युटीपार्लरच्या माध्यमातुन आपण कसे सशक्त होऊन त्यापासून आपण आपल्या स्वतःच्या पायावर कसे उभे राहून व्यवसाय करू शकतो असे मार्गदर्शन सरपंच नंदा महाजन यांनी केले.

याप्रसंगी आस बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष महेंद्र पाटील, उपसरपंच जागिर तडवी सदस्य भावना महाजन, अफसाना तडवी, अनिल अडकमोल, प्रमोद महाजन, सामाजीक कार्यकर्ते गोपाळ महाजन, भरत महाजन, मोहराळे विकास सोसायटीचे चेअरमन निर्मला महाजन, संजय पाटील, फकीरा पाटील, ग्रामसेवक राजेश महाजन, रवींद्र पाटील, सुलेमान तडवी, ब्युटी पार्लर प्रशिक्षणात सौ स्वाती ठाकूर या तरूणी व महिला यांना प्रशिक्षण देणार आहेत.

तरी गावातील परिसरातील महिलांनी व तरूणींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे . विकास सोसायटी मोहराळे यांच्या कार्यालयामध्ये प्रशिक्षण होणार आहे, तरी मुली महिलांनी यामध्ये भाग घ्यावा, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र पाटील यांनी केले तर आभार कल्पेश चोपडे यांनी मानले.

 

Protected Content