Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर येथे विद्याप्रबोधिनीतर्फे ‘विदेशात एमबीबीएस’ विषयावर मार्गदर्शन व चर्चासत्र

रावेर प्रतिनिधी । विद्याप्रबोधिनी आणि जॉर्जिया- फिलीपीन्स येथील आत्मीया एज्युकेशन या संस्थेमार्फत विदेशात डॉक्टर होऊ इच्छिणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी मोफत मार्गदर्शन आणि चर्चासत्र शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

विद्याप्रबोधिनीचे संचालक योगेश पाटील यांनी चर्चा सत्र आयोजित केले होते. जॉर्जिया आणि फिलीपीन्स येथील MBBS बाबत अधिक माहितीसाठी विद्याप्रबोधिनी, सरदार वल्लभभाई पटेल हॉलसमोर, BSNL ऑफिस समोर, जिल्हापेठ, जळगाव येथे किंवा 84477 03043 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन विद्याप्रबोधिनीचे संचालक योगेश पाटील सर यांच्यामार्फत करण्यात आले आहे. चर्चासत्राच्या सुरुवातीला खा. उन्मेष पाटील, आ. सुरेश भोळे, धांडे कोचिंग फाऊंडेशन चे संचालक. नेमिवंत धांडे सर, रावेर येथील सुप्रसिध्द डॉ. संदिप पाटील, ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते. आर. बी. नाना पाटील, आत्मिया एज्युकेशन चे सी.ई.ओ. चिराग वाघेला, व्हाईस प्रेसिडेंट रोहित गोकाणी, प्रसिध्द मानसतज्ञ रागिब अहमद, बॅंक ऑफ बडोदा चे डेप्युटी मॅनेजर श्री. साई नरेश, विद्याप्रबोधिनीचे संचालक योगेश पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.

सध्याच्या शैक्षणिक युगात शिक्षण फार मोलाचे व महाग झालेले आहे. ग्लोबलायझेशनमुळे जग हे लहानही व्हायला लागले आहे. त्यामुळे आपल्या शहरात, राज्यात, भारतातच नव्हे, तर जगातल्या कुठल्याही देशात, कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये तिथे जाऊन शिक्षण घेणे खूप सोपे झाले आहे. भारताच्या तुलनेत जॉर्जिया आणि फिलीपीन्स येथील शिक्षण हे चार पटीने कमी खर्चात, सुलभ, सोयीस्कर व आधुनिक मिळत आहे. येथे MBBS केल्यानंतर उपलब्ध संधी आणि उज्वल भविष्यासंबंधी मोलाचे मार्गदर्शन केले.

Exit mobile version