Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जीएसटीचे दर वाढण्याची शक्यता

gst

मुंबई वृत्तसंस्था । महसूल घटल्याने केंद्र सरकार लवकरच सर्वांच्या खिशाला कात्री लावण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकार वस्तू आणि सेवा कर प्रणालीमध्ये वाढ करण्याच्या तयारीत आहे. नव्या धोरणानुसार सध्या ज्या वस्तूंवर ५ टक्के जीएसटी आकारला जातो. त्यावर आता १० टक्के आकारला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार आहे.

वस्तू आणि सेवा कर प्रणाली लागू होऊन तब्बल अडीच वर्ष पुर्ण झाली. यादरम्यान केंद्र सरकाने जीएसटीच्या स्लॅबमध्ये अनेक बदल केले. परंतू आता महसूल घटल्याने पुन्हा एकदा जीएसटीचे स्लॅब बदलण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. करामधून येणारा महसूल वाढवण्यासाठी जीएसटी काऊंन्सिल १२ टक्क्यांचा स्लॅब बंद करून यादरम्यान येणाऱ्या सर्व २४३ वस्तूंवर १८ टक्के कारण्यावर विचार करू शकते. जर यावर शिक्कामोर्तब झालं आणि जीएसटी स्लॅबमध्ये बदल करण्यात आले तर याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे.

महसूलात घट
१ जुलै २०१७ रोजी जीएसटी लागू झाल्यानंतर अनेक वस्तूंवरील करात कपात करण्यात आली होती. ज्यामुळे १४.४ टक्क्यांवरून कराचा दर कमी होऊन तो ११.६ टक्क्यांवर पोहोचला आहे. याचा फटका महसूलावर बसला असून वर्षाला जवळपास २ लाख कोटी रूपयांचा फटका बसला आहे. महसूल दराशी तुलना केल्यास ही घट वाढून २.५ लाख कोटी रूपयांवरही जाऊ शकते, असं मत माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांनी व्यक्त केलं.

जीसटी स्लॅबमध्ये बदल झाल्यास सरकारी तिजोरीत १ लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक वाढ होणार आहे. सध्या ज्या वस्तूंवर कोणताही कर आकारला जात नाही त्यावरही कर लावण्यावर विचार केला जाऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे.

Exit mobile version