किराणा दुकानदाराची ऑनलाईन १५ हजारांची फसवणूक

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील किराणा दुकानदाराची ऑनलाईन १५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे.

ऑनलाईन मसाला विक्री करणार्‍या पोस्टवर संपर्क साधून २० हजार रूपयांच्या मालाची ऑर्डर केली. माञ १५ दिवस उलटूनही माल न आल्याने संबंधितास संपर्क साधला असता त्याने ५ हजार रूपये परत केले माञ माल दिलाच नाही. आपली फसगत झाली हे लक्षात येताच दुकानदाराने पाचोरा पोलीसात धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

येथील किराणा दुकानदाराची ऑनलाईन मसाला विक्री करणार्‍या पोस्टवर संपर्क साधून २० हजार रूपयांच्या मालाची ऑर्डर केली. माञ १५ दिवस उलटूनही माल न आल्याने संबंधितास संपर्क साधला असता त्याने ५ हजार रूपये परत केले माञ माल दिलाच नाही. आपली फसगत झाली हे लक्षात येताच दुकानदाराने पाचोरा पोलीसात धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पाचोरा पोलीसांकडून मिळालेली माहीती अशी की, ‘शहरातील मराठे शॉपिंग कॉप्लेक्समधील होलसेल किराणा दुकानाचे गणेश केसवाणी यांचा पुतन्या प्रिन्स केसवाणी याने फेसबुक गृप ब्लॅकपेपर ट्रेडिंग मार्केटवर काही दिवसांपूर्वी ऑनलाईन मसाले विक्रीबाबत जाहिरात वाचली व लाईक केली.

त्यानंतर प्रिन्स यास ‘६३५५० ३९७९७’ या क्रमांकावरून फोन आला व तुम्हाला मसाले हवे आहेत का ? अशी विचारणा करण्यात आली.. बालविर इंटरप्राईज, १८ गोडावून, लक्ष्मी पेट्रोलपंपासमोर, जेटपुर हायवे, साबलपूर,जुनागड हा आमचा पत्ता असून बॅक ऑफ बडोदा या बॅकेच्या ‘५८६८०१००००२६४’ या क्रमांकावर पैसे पाठवून मालाची ऑर्डर करण्याचे सांगीतले. प्रिन्स याने ९ हजार किंमतीचे १८० रूपये किलो दराने ५० किलो जिरे, ११ हजार ५०० रूपये किंमतीचे ४६० किलो दराने २५ किलो मीरे अशी एकूण २० हजार ५०० रूपयांची ऑर्डर दिली. तसेच आणि पेमेंटही पाठवून दिले.

ऑर्डर टाकून बराच कालावधी झाला माञ माल आला नाही म्हणून फोन करून चौकशी केली असता सुरूवातीला उडवा उडवीची उत्तरे मिळाली. नंतर वाद वाढत गेला त्यावेळी बालविर इंटरप्राईजकडून ४ हजार ९९० रूपये खात्यावर परत केले माञ उर्वरित पैसे अथवा माल न पाठवल्याने आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच प्रिन्सचे काका गणेश केसवाणी यांनी पाचोरा पोलीसामध्ये तक्रार दिली.

याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉंस्टेबल विनोद पाटील हे तपास करित आहेत.

Protected Content