Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपूर येथे श्री संताजी जगनाडे महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

WhatsApp Image 2019 12 08 at 4.28.51 PM

फैजपूर, प्रतिनिधी | संत श्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९५ वी जयंती निमित्त फैजपूर येथे विविध ठिकाणी आज त्यांना अभिवादन करण्यात आले. श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

नगरपालिका , प्रांत अधिकारी कार्यालय, पी. वाय. चौधरी प्राथमिक विद्यालय, शकुंतला जिवराम महाजन माध्यमिक विद्यालय यां ठिकाणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पूजन आणि मल्यार्पण करून जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला प्रांतअधिकारी डॉ. अजित थोरबोले, नगरसेवक अमोल निंबाळे, मनोज कापडे, तेली समाज अध्यक्ष सुरेश कपले, उपाध्यक्ष संजय तेली, युवा अध्यक्ष भारत चौधरी, दिलीप तेली, रवींद्र तेली, मुख्याध्यपक गुरव, सदाशिव कपले, भास्कर सुरंगे, दिलीप रावते, ललित वारके, किशोर नारखेडे, भंगाळे मॅडम, संजय वारके, कामलाकर कोष्टी, तसेच पालिका कर्मचारी सुनील कोळी, शरद भारंबे, सुरेश मेढ़े उपस्थित होते.

Exit mobile version