Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरपावली ग्रामपंचायत तर्फे सावित्रीबाई फुलेंना विनम्र अभिवादन

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायतच्या वतीने देशातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या १९०व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

ग्राम पंचायत कोरपावली येथे माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे कोरपावली गावचे प्रथम नागरिक सरपंच विलास अडकमोल यांच्या हस्ते पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच नागो तायडे यांच्या हस्ते देशाच्या थोर समाजसेविका क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. या प्रसंगी सरपंच विलास अडकमोल यांच्यासह काँग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष तथा कोरपावलीचे माजी सरपंच जलील पटेल, उपसरपंच प्रतिनिधी व युवा समाज सेवक मुक्तार पिरण पटेल, कोरपावली ग्राम पंचायतचे सदस्य सत्तार तडवी, आरिफ तडवी, अफरोज पटेल, ग्रामस्थ सिकंदर तडवी, नागो तायडे, आदीवासी समाजाचे जेष्ठ समाजसेवक मुनाफ तडवी, उमेश जावळे तसेच ग्राम पंचायत कर्मचारी किसन तायडे, सलीम तडवी, समीर तडवी यांच्यासह ग्रामस्थ मंडळी व आदींची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

 

Exit mobile version