Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संत सावता माळी पुण्यतिथीनिमित्ताने अभिवादन

जळगाव,प्रतिनिधी । येथील श्री संत शिरोमणी सावता माळी प्रतिष्ठानतर्फे रविवार, १९ रोजी सकाळी दादावाडी परिसरात संत सावता माळी यांची पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्ह्यात आणि शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने गर्दी टाळण्यासाठी साध्यापद्धतीने हा कार्यक्रम झाला.

दादावाडी येथील सोमनाथ महाजन यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात मोजकेच समाजबांधव उपस्थित होते. प्रारंभी प्रतिमापूजन सोमनाथ महाजन आणि वैशाली सोमनाथ महाजन यांच्या हस्ते झाले. यावेळी देशात आणि जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा लवकर सुटका मिळावी, अशी प्रार्थना समाजबांधवांनी केली. दरवर्षी संत सावता माळी जयंती येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. परंतु, यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता साध्यापद्धतीने हा कार्यक्रम झाला. यावेळी शासनाच्या नियमांनुसार सोशल डिस्टन्सिंग पालन करण्यात आले. याप्रसंगी श्री संत शिरोमणी सावता माळी प्रतिष्ठानचे शरद मोरे, प्रकाश साबंळे, पांडुरंग महाजन, संजय महाजन, बापू वराळे आदी उपस्थित होते.

Exit mobile version