डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

जळगाव प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयासह गोदावरी फाऊंडेशन संचलित विविध शैक्षणिक संस्थांमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

राजमाता जिजाऊ यांची ४२४ वी आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या १५९ व्या जयंतीनिमित्‍त डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्या निलीमा चौधरी यांच्याहस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण करण्यात आले. तसेच हृदयरोग तज्ञ डॉ.वैभव पाटील यांच्याहस्ते युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण करण्यात आले. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी राजमाता जिजाऊ आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचे स्मरण केले. याप्रसंगी डॉ उल्हास पाटील इंग्लीश मिडीयम स्कुल भुसावळ, डॉ उल्हास पाटील सीबीएसई स्कुल सावदा, डॉ उल्हास पाटील होमीओपॅथी, फिजीओथेरेपी, गोदावरी नर्सिंग, डॉ उल्हास पाटील कृषि अभियांत्रिकी व अन्न व तंत्रज्ञान, कृषि महाविद्यालय, गोदावरी अभियांत्रिकी, गोदावरी आय एम आर, विधी महाविद्यालय, फॅशन महाविद्यालय, गोदावरी संगीत महाविद्यालय आदि ठिकाणी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकांनद यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकी पाटील, किशोर झांबरे, अनंत इंगळे, अमोल बोंडे, सुजित ढाके, कल्पेश पाटील, मनोज सोनार, किशोर नांदवे, सागर गव्हाळ, रितेश बोरोले, महेंद्र चौधरी, राजू राणे, निलेश पाटील, सागर पाटील, आर्टिस्ट दिनेश पाटील, सोशल मिडीया प्रमुख गणेश महाजन, सुरेश अहिरराव, तुषार कानडे, कल्याणी कुलकर्णी, आदि उपस्थीत होते.

Protected Content