Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोदावरी फाऊंडेशनतर्फे महापरिनिर्वाणदिनानिमित्त महामानवाला अभिवादन

जळगाव प्रतिनिधी । महापरिनिर्वाणदिनानिमित्त आज ६ डिसेंबर रोजी गोदावरी फाऊंडेशनतर्फे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आज सकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, अकाऊटंट किशोर झांबरे, नर्सिंग डायरेक्टर शिवानंद बिरादर आदि उपस्थीत होते. मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पूष्प अर्पण करुन अभिवादन केले तसेच त्यांच्या कार्याची उपस्थीतांनी माहिती दिली.

शैक्षणिक संस्थांमध्ये अभिवादन 

गोदावरी फाऊंडेशन संचलित विविध शैक्षणिक संस्थांमध्ये ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्‍त अभिवादन करण्यात आले. यात डॉ उल्हास पाटील इग्लीश मिडीयम स्कुल भुसावळ येथे प्रीन्सीपल अनघा पाटील, डॉ उल्हास पाटील सीबीएसई स्कुल सावदा येथे प्रिन्सीपल भारती महाजन , गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रिन्सीपल निलीमा चौधरी,  डॉ उल्हास पाटील होमीओपॅथीत प्राचार्य डॉ डी बी पाटील, फिजीओथेरेपीत प्राचार्य डॉ जयवंत नागुलकर, गोदावरी नर्सिंगमध्ये प्राचार्य मौसमी लेंढे, डॉ उल्हास पाटील कृषि अभियांत्रिकी व अन्न व तंत्रज्ञान मध्ये डॉ पी आर सपकाळे, डॉ.अशोक चौधरी, कृषि महाविद्यालयात डॉ एस एम पाटील, गोदावरी अभियांत्रिकीत डॉ व्ही एच पाटील, प्रविण फालक, गोदावरी आय एम आरमध्ये डॉ प्रशांत वारके, अ‍ॅड सतिष गाडगे, फॅशन महाविद्यालयात उज्वला मावळे, गोदावरी संगीत महाविद्यालयात पदमजा नेवे यांचेसह कर्मचारी व शिक्षक वृंद उपस्थीत होते.

 

Exit mobile version