Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात गुरुपौर्णिमानिमित्त बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील शिवभोजन केंद्र येथे आज गुरुपौर्णिमाचे औचित्य साधत शिवसेनिकांनी सर्वाचे हिंदू ह्रदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पूजन व पुष्पहार अर्पण करुन गुरुपौर्णिमा साजरी केली आहे. 

आज सकाळी 11 वाजता  बाळासाहेब यांच्या प्रतिमेस पूजन व पुष्पहार ज्येष्ठ मार्गदर्शक विलास मुळे शिवसेना जिल्हा संगठक रावेर लोकसभा, प्रा. उत्तमराव जी. सुरवाड़े, शिवसेना कार्यालयीन उपजिल्हा प्रमुख, मुकेश जी गुंजाल शिवसेना नगरसेवक, नीलेश जी महाजन शिवसेना शहर प्रमुख उत्तर विभाग, विजय जी सुरवाड़े पंचायत समिति सदस्य, ज्येष्ठ शिवसैनिक शरद जी जोहरे, कट्टर शिवसैनिक व शिवभोजन केंद्र संचालक आयोजक उमाकांत शर्मा आदि उपस्थित होते. तसेच यावेळी गोर-ग़रीब, गरजू लोकांना शिवभोजन सोबत गोड़वा म्हणून बूंदीचे लाडू वाटप करण्यात आले. 

बाळासाहेब यांना अभिप्रेत असलेल्या महाराष्ट्र घडविण्यासाठी व त्यांच्या स्वप्न पूर्ण करून उद्धव साहेब यांनी शिवभोजन योजना कोरोनाच्या पार्श्वभूमि वर घेतलेला योग्य निर्णय आहे साहेबांनी बोलले होते आमच्या सरकार आल्या वर सर्वात स्वस्वत जेवण देऊँ आणि ते स्वप्न साकार झाले. असे मनोगत आयोजक व शिवभोजन केंद्र संचालक शिवसैनिक उमाकांत शर्मा यांनी व्यक्त केले.

 

Exit mobile version