Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

झांबरे माध्यमिक विद्यालयात अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांनी अण्णाभाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. शाळेचे पर्यवेक्षक नरेंद्र पालवे यांनी अण्णा भाऊंच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने त्यांचे जीवन चरित्र सांगितले. तर विद्यार्थ्यांना त्यांच्या साहित्याची ओळख होण्याच्या दृष्टीने त्यांना स्मशानातील सोने , दादा नाव्ही, भुतांचा वाडा. जोगीन इत्यादी कथांचे ऑडिओ क्लिप व पोवाडे ऐकवण्यात आले आणि विद्यार्थ्यांना लोकमान्य एक युगपुरुष हा चित्रपट दाखवण्यात आला. त्यानंतर सदर कार्यक्रमाची सांगता करताना शेवटी विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून केली त्यात दामोदर चौधरी , सृष्टी कुलकर्णी , भार्गवी भंगाळे ,अंकित कोळी , तन्मय पाटील, या संच विद्यार्थ्यांनी बक्षीस पटकावले सदर कार्यक्रमाचे आयोजन वर्षा विनायक चौधरी प्रतिभा लोहार, शीतल भंगाळे, वदंना खेडकर यांनी केले.

Exit mobile version