भाजपा कार्यालयात महात्मा फुले पुण्यातिथीनिमित्त अभिवादन

जळगाव प्रतिनिधी । महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त बळीराम पेठेतील भाजपा कार्यालयात जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष उदय बापू वाघ यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा शहराचे आमदार राजूमामा भोळे, जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र मराठे, जिल्हा चिटणीस प्रा.भगतसिंग निकम, संघटन सरचिटणीस सचिन पानपाटील, जेष्ठ कार्यकर्त सुभाष सौचे,अरुण भोई, प्रशांत सावंत कार्यालय मंत्री गणेश माळी, सनी महाजन आदी कार्यकर्त उपस्थित होते.

Protected Content