Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगावात दाभोलकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन

चाळीसगाव प्रतिनिधी । डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त अंधश्रध्दा निर्मुलन समिती चाळीसगाव यांच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन महात्मा फुले नगरात करण्यात आले. 

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या वतीने शहरातील महात्मा फुले नगर येथे अभिवादन सभेचे आयोजन शुक्रवार रोजी सकाळी करण्यात आले. यावेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करून अभिवादन सभेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी निता सामंत यांनी अंधश्रध्दा निर्मुलन समिती विषयी माहिती देऊन इतिहासावर मार्गदर्शन केले. तसेच सागर नागने यांनी जादूटोणा विरोधी कायदा आणि त्याचा लढा व प्रवास समजावून सांगितला. तर दिलीप चव्हाण यांनी अंनिस प्रेरणा उद्देश आणि माझा सहभाग यावर मार्गदर्शन केले. दरम्यान सूत्रसंचलन कलप्तेश देशमुख यांनी तर प्रास्ताविक नितीन परदेशी यांनी केले.

सदर अभिवादन सभेत अभिवादन गित  सादर करण्यात आले. त्यात मोनाली कांबळे, जयश्री गायकवाड, शितल पाटील, संघमित्रा त्रिभुवन, कविता सावले, रत्ना शेजवळ, सपना अहिरे, उज्वला कांबळे हे सहभागी होते. त्याचबरोबर सुनील गायकवाड व आशितोष अहिरे यांनी साथ संगीत केले. अभिवादन सभेस प्रा. विजया चव्हाण, वैशाली निकम, प्रतिभा पाटील, मंदा कांबळे, प्रा. गौतम निकम, गणेश भोई, सतीश पाटील, निलेश परदेशी, शंकर पगारे, प्रा.किरण पाटील,सचिन आगोने व मोठ्या संख्येने परिसरातील महिला उपस्थित होत्या.

 

Exit mobile version